अमरावती येथील घनश्याम राजेंद्र ढोले यांच्यावर गुन्हा दाखल करा, समर्थ वाडी संस्थान भाविकांची मागणी

Nov 3, 2023 - 00:23
Nov 3, 2023 - 00:24
 0
अमरावती येथील घनश्याम राजेंद्र ढोले यांच्यावर गुन्हा दाखल करा, समर्थ वाडी संस्थान भाविकांची मागणी

मुक्ताई वार्ता रावेर

न्यूज नेटवर्क 

अमरावती येथील घनश्याम राजेंद्र ढोले याने समर्थ वाडी संस्थानवर केलेल्या खोट्या व निराधार आरोपांमुळे धार्मिक भावना दुखावल्या आहे. त्यामुळे ढोले यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

 याबाबत रावेर शहर पोलिस ठाण्यात पो नि कैलास नागरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले की, अमरावती येथील समर्थ वाडी हे धार्मिक संस्थान असून, राज्यासह देशभरात या संस्थानचे भाविक मोठ्या संख्येने आहेत. कोणतेही प्रसिद्धीच्या मागे न लागता संस्थानचे

प्रमुख विश्वस्त भाऊसाहेबांनी आपल्या हयातभर योगिराज गोविंद महाराज यांनी घालून दिलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरा अविरत सुरू ठेवल्या आहेत. यासाठी त्यांनी आपल्या हयातीत अपारश्रम व कष्ट सोसले आहेत. मात्र, ढोले यांनी खोटे तथा तथ्यहीन आरोप केल्याने धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे.

 या प्रकरणी गुन्हादाखल करण्याची मागणी तुषार मानकर, सुधिर मानकर, अक्षय मानकर, शुभम मानकर, हर्षल मानकर, स्वर्णिम मानकर आदींनी केली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील