अपहरण झालेल्या सहा मुलांचा लावला शोध रावेर पोलिसांची मोठी कारवाई
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर I रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करीत रावेर पोलीस ठाणे हद्दीतील अपहरण झालेल्या सहा मुलांचा शोध लावून पालकांच्या ताब्यात दिले

रावेर पोलीसांच्या अथक प्रयत्नांमुळे रावेर पोलीस हद्दीतील फुस लाऊन पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुली यांचा मध्यप्रदेश राज्यातून तर दोन अल्पवयीन मुले व दोन अल्पवयीन मुली यांना ओडीसा राज्यातून असे एकुण सहा अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यास पोलीसांना यश आले आहे.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुले, मुलींना कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावुन पळवून नेले होते. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास चालु असतांना गुप्त माहितीच्या आधारे नातेवाईक यांची चौकशी करुन, सिसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विष्लेशन करुन गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुले व मुलींची माहिती काढुन त्यांना टिकिरी जि. रायगड ओडीसा मकपदारा येथील जंगलामधून गु.र.न. १४८,१४९ बिएनएस कलम १३७ (२) प्रमाणे, दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन दोन मुली व दोन मुले यांचा शोध घेतला. त्यानंतर गुरन १३१ भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील एक मुलगी हिस इंदौर येथुन शोध घेण्यात आला व गुरन १४३ प्रमाणे मधील एक मुलगी नायर ता. खकनार जि. बुऱ्हाणपुर मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवुन त्यांना सुखरुप रावेर येथे आणून त्यांना त्यांच्या आई वडीलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे. या कारवाईने पालकांमध्ये आनंद व्यक्त होऊन त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोख नखाते, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील, दिपाली पाटील, पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, पो.कॉ. सचिन घुगे, नितीन सपकाळे, श्रीकांत चव्हाण, पो.कॉ. गौरव पाटील (स्था.गु.शा.जळगांव) यांच्या पथकाने कारवाई केली.