35 वर्षीय तरुणाचा देवीच्या मूर्ती खाली दबल्याने दुर्दैवी मृत्यू

35 वर्षीय तरुणाचा देवीच्या मूर्ती खाली दबल्याने दुर्दैवी मृत्यू

Oct 16, 2023 - 00:22
 0
35 वर्षीय तरुणाचा देवीच्या मूर्ती खाली दबल्याने दुर्दैवी मृत्यू

मुक्ताई वार्ता रावेर

नवरात्र उत्सवासाठी देवीची मुर्ती बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर मार्गे जळगाव कडे आणतांना अपघात झाल्याने अंगावर देवीची मुर्ती पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील 35 वर्षीय तरूण संजय उर्फ जितू गोपाल कोळी, जोशी वाडा, मेहरूण यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटनना मध्यरात्री घडली आहे. 

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

 जळगाव येथील मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी गेलेले होते. मूर्ती घेऊन येत असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती  संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने दाबले गेल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. कुटुंबियांना फोनवर माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी जळगाव येथील एका कंपनीमध्ये संजय कोळी 

काम करीत होता.मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या अपघाताने मात्र तरुणांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील