19 वर्षीय विवाहित तरुणीची तापी नदी पात्रात आत्महत्या, सासरच्या तिघांना अटक
19 वर्षीय विवाहित तरुणीची तापी नदी पात्रात आत्महत्या, सासरच्या तिघांना अटक
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील 19 वर्षीय विवाहितेने नदीपात्रात आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिघा आरोपींना अटक करण्यात आली.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली येथील रहिवासी वंदना कल्पेश बेलदार वय 19, ही विवाहिता नेहमीच विमल पुडी खात असल्याचा आरोप पतीसह सासरची मंडळी करीत असल्याने यास कंटाळून विवाहितेने रविवार, 28 एप्रिल रोजी दुपारी साडेपाच वाजेनंतर अंतुर्ली शिवारातील तापी पात्रात आत्महत्या केली होती. सुरूवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मयत वंदना बेलदार यांची आई दुर्गाबाई दीपक बेलदार (45, अंतुर्ली) यांनी याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिल्यावरून पती कल्पेश अरुण बेलदार, मिराबाई अरुण बेलदार, अरुण शेषराव बेलदार (सर्व रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नेहमीच मुलगी ही विमल पुडी खात असल्याचा आरोप करीत होते व त्यातूनच तिने नदीपात्रात आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बोरकर करीत आहेत.