हनीट्रॅप'चे जाळे : महिलेला एक लाख स्वीकारतांना रंगेहात अटक, न्यायालयाने सुनावली 5 दिवसाची पोलीस कोठडी

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l हनीट्रॅप'चे जाळे : महिलेला एक लाख ची खंडानी स्वीकारतांना बुधवार रोजी रंगेहात अटक करण्यात आली होती त्याचबरोबर तिच्या मुलांनाही अटक करण्यात आली होती दोघांना आज न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठाडी सुनावण्यात आली.

Mar 20, 2025 - 21:22
 0
हनीट्रॅप'चे जाळे : महिलेला एक लाख स्वीकारतांना रंगेहात अटक, न्यायालयाने सुनावली 5 दिवसाची पोलीस कोठडी

'हनीट्रॅप'चे जाळे : महिलेला एक लाख स्वीकारतांना रंगेहात अटक !

 रावेर न्यायालयाने सुनावली  पाच दिवसाची कोठडी 

 मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l

तालुक्यातील एका धनाढ्य व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून वारंवार पैसे उकळणाऱ्या महिलेला एक लाख रूपया स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील एक इसम २०१८ मध्ये स्वतः च्या कार मध्ये जळगाव येथे जात असतांना एका ४३ वर्षाच्या महिलेने गाडीत लिफ्ट मागीतली . सोबत प्रवास केल्यामुळे त्यांची मैत्री वाढली. त्यामुळे तिने सदर इसमास जेवणास बोलवले. तिने कोल्ड्रीक्स मध्ये गुंगीचे औषध टाकुन त्यास बेशुद्ध करून त्याचे सोबत शारीरिक संबंध केल्याचा बनाव केला. यानंतर तिने त्याचे व्हिडिओ चित्रण करून सदर इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी सदर इसमास दिली.

यामुळे सदर इसमाला भीतीपोटी वारंवार तिच्याकडे जावे लागत होते. यानंतर ती वारंवार खंडणी मागु लागली. २३ डिसेंबर २०२३ पासून सदर महिला व तिचा मुलगा निर्मल पाटील (वय २१) या दोघांच्या खात्यात फोन पे द्वारे सुमारे ११ लाख रुपये टाकले होते. यामुळे त्या महिलेची मागणी वाढत गेली. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर महिलेने फिर्यादीने ५ कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा पावती करून घेतला. या महिलेची पैशांची मागणी वाढत गेल्यामुळे सदर इसम त्रस्त झाला होता. त्याने रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना ही माहिती दिली.

यावरून बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास जयस्वाल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे, महिला पोलीस माधवी सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांचे पथक पाठवून या महिलेवर कारवाईचे निर्देश दिले. तिला रंगे हात पकडण्यासाठी सापळा रचला. रावेर बऱ्हाणपूर मार्गावरील येथील एसएसबीटी मार्ट या दुकानाच्या मागील बाजूस सदर इसमास महिलेने एक लाख रुपये घेऊन बोलावले होते. यावेळी पोलिसांनी सदर पैसे स्वीकारताना त्या महिलेस रंगेहात पकडून तीला पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्व महिलेच्या मुलालाही अटक करण्यात आली आहे 

याबाबत सदर इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या महिलेने याच प्रकारे इतरांना देखील जाळ्यात अडकवले आहे का ? या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

 आज मुलगा व आई या संशयित  आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून यामध्ये आणखी काय समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील