श्री साईबाबा मंदिराचा १० वा.वर्धापन दिन उत्साहात साजरा
श्री साईबाबा मंदिराचा १० वा.वर्धापन दिन उत्साहात साजरा
मुक्ताई वार्ता
रावेर|प्रतिनिधी-
शहरातील अष्टविनायक नगरातील श्री.साईबाबा मंदिराचा १० वा.वर्धापन दिन रामनवमीला उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बुधवार १७ रोजी सकाळी ७ वा.श्री.साईबाबा यांचा महाभिषेक व महाआरती करण्यात आली.यावेळी छावा संघटनेचे अध्यक्ष सुनील उर्फ बुधा महाजन यांच्या परिवारातर्फे साईबाबा मूर्तीसाठी आणलेली जरतारीची शाल मूर्तीवर चढवण्यात आली.यानंतर दुपारी १२ वा.प्रभू रामचंद्राचा जन्मसोहळा पार पडला.या प्रसंगी महापूजा कुणाल महाजन या नव दाम्पत्याच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.यानिमित्ताने मंदिराच्या गर्भगृहाची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.तर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.दुपारी १२ वाजेपासून ५ पर्यंत सुमारे २ हजार भाविकांनी पुरी,भाजी,शिरा महा प्रसादाचा आस्वाद घेतला.यानंतर सायंकाळी ७ वा.महाआरती आशालता राणे यांच्या हस्ते करण्यात आली.रात्री ८ वा.हभप संतोष महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी साईबाबा मंदिर समितीचे चंद्रकांत विचवे,सुनील सोपान महाजन,सुनील सुरेश महाजन,अरुण चौधरी.वाय.एस.महाजन,पी.एन महाजन,पंडित चौधरी.आशालता राणे,संजय महाजन,राजेश महाजन यांनी परिश्रम घेतले.
--------------------