श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला शरद पवार जामनेरला , महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला शरद पवार जामनेरला ,महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
मुक्ताई वार्ता प्रतिनिधी
रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २१ एप्रिलला जामनेर येथे येत आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीत जामनेर येथील भागीरथी मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात श्री पवार महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.मेळाव्यास महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट जामनेर तालुका प्रमुख ऍड ज्ञानेश्वर बोरसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी केले आहे.