शिवकालीन राष्ट्रस्तरीय स्पर्धेत मर्दानी खेळाचे रावेर ला ८ पदके, डॉ. संदीप पाटील यांनी केला सत्कार
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l शिवकालीन राष्ट्रस्तरीय स्पर्धेत मर्दानी खेळाचे रावेर ला ८ पदके, जिल्हा मर्दानी असोसिएशनचे डॉक्टर संदीप पाटील यांनी केला सत्कार

रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क l
जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रथमच मर्दांनी स्पोर्ट्स असोसिएशन व मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी राष्ट्रीय मर्दानी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षताई खडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत रावेर येथील शिव फुले मर्दांनी आखाड्यातील ८ खेळाडूंनी पदकांची कमाई केली.
या सर्वांचा सत्कार जिल्हा मर्दानी असोसिएशनचे डॉक्टर संदीप पाटील व डॉक्टर योगिता पाटील यांनी केले
यातील विजयी खेळाडू पौर्णिमा महाजन - गोल्ड मेडल,सोनाली चौधरी - गोल्ड मेडल,महिमा महाजन - गोल्ड मेडल,ईश्वरी महाजन - सिल्वर मेडल,परी महाजन - सिल्वर मेडल,पल्लवी महाजन - सिल्वर मेडल,काजल महाजन - ब्रांच मेडल,चैताली महाजन - ब्रांच मेडल यांनी एकूण आठ मेडलची कमाई करून रावेर शहराचे नाव उंचविले. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक युवराज माळी व जीवन महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तर विजय सर्व खेळाडूंना रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष प्रकाशजी मुजुमदार सर, उपाध्यक्ष अशोक शेठ वाणी, चेअरमन डॉक्टर दत्तप्रसाद दलाल, सचिव अक्षय अग्रवाल, दोघ शाळेतील मुख्याध्यापक आर आर पाटील सर, नीलम पुराणीक मॅडम, सरदार जी जी हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य शैलेश राणे सर, शाळेचे उपमुख्याध्यापक एन जे पाटील सर, कमलाबाई गर्ल्स हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आर एल तायडे सर, सरदार जी हायस्कूलचे सहसचिव व पर्यवेक्षक वाय जी कट्यारमल,एस आर महाजन, डॉ. सुरेश महाजन, डॉ.मिलिंद वानखेडे, अजय महाजन, प्रतिक खराले व अंबिका व्यायाम शाळा रावेर, सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब रावेर यांनी विजयी खेळाडूंनचे अभिनंदन केले.