रावेरच्या पोदार स्कूलची यशस्वी भरारी;CBSE संलग्नताची मिळाली मान्यता
रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क :-रावेर येथील पोदार स्कूलने यशस्वी भरारी घेत दिल्ली CBSE संलग्नताची मान्यता मिळवल्याने सर्वत्र शाळेचे अध्यक्ष डॉक्टर गुलाबराव पाटील व सचिव,संचालक मंडळाचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे
रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क :- रावेर पोदार लर्न स्कूलला नवी दिल्ली सिबीएससी बोर्डची पहिल्याच प्रयत्नात CBSE संलग्नता प्राप्त झाली आहे. यामुळे आपल्या रावेर परिसरातील नागरिकांना दर्जेदार शिक्षण प्रणाली उपलब्ध झाली आहे.६० विद्यार्थांना पासुन सुरू झालेली पोदार स्कूलमध्ये आता ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संलग्नता प्राप्त झाल्या बद्दल शाळेच्या टीमचे कौतुक होत आहे.
रावेर शहरातील अंजदा रस्त्याने असलेली पोदार लर्न स्कूलला सिबीएससी बोर्डची संलग्नता प्राप्त झाली आहे. नुकतीच दिल्ली बोर्डच्या टीमने शाळेला भेट दिली होती. यावेळी शाळेचे व्यवस्थापन सुसज्ज लायब्ररी, हायटेक प्रयोगशाळा, मुलांना शिक्षण व्यवस्थापन तसेच स्वच्छता शाळेसाठी लागणारे सर्व सोयीसुविधा चांगल्या दर्जाची मिळाल्याने शाळेला संलग्नता प्राप्त झाली आहे.
रावेर परिसरातून हजारो विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून बुऱ्हाणपूर ( मध्य प्रदेश ) येथे जात असतात.त्यांना प्रवासाचा होणारा त्रासामुळे मुलांना वेळ कमी मिळत होता.आता रावेरमध्ये सीबीएससी मार्फत दर्जेदार शिक्षण प्रणाली उपलब्ध झाल्याने अनेक पालकांना आता रावेर शहर जवळ पडेल.रावेर पोदार स्कूल CBSE संलग्नता क्रमांक 1131580मिळाला असून संस्थेचे अध्यक्ष डॉ गुलाबराव पाटील यांनी सांगितले की पोदार लर्न स्कूल, रावेर पहिल्याच प्रयत्नात CBSE संलग्नता प्राप्त झाली आहे.
पालकांचा आमच्यावरील विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.पुढे देखील उत्कृष्टतेसाठी कटिबद्ध. उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत त्यांनी शाळेच्या सचिव सुचिता पाटील व प्राचार्य डॉ जतीन हिंदुजा यांचे विशेष परिश्रम असल्याचे सांगितले.