शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या सावदा येथिल कुंभार बंधूचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या सावदा येथिल कुंभार बंधूचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क
रावेर तालुक्यातील सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाळ्यातील रहिवासी तरुण बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी शनिवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी मोटरसायकलने जात असताना बोहर्डी गावा लगत अज्ञात वाहनाच्या धडकेत सख्या दोघे चुलत भाऊ ठार झाले.
बोदवड तालुक्यातील जागृत देवस्थान शिरसाळा येथे देव दर्शनासाठी रावेर तालुक्यातील सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाडा परिसरातील दोन तरुण मारुती दर्शनास बाईक ने जात असताना बोहर्डी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत भास्कर कुंभार याचा जागीच मृत्यू तर लखन कुंभार याचा भुसावळ येथे खाजगी रुग्णालया रिदम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा मोलमजुरी करून उदरनिर्वाह होते. त्यांच्या या अचानक झालेल्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.