वडिलांच्या त्यागाला मुलीने घातली यशाने गवसणी
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर-: वडिलांनी आपली एक एकर शेती विकून मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :
मुलीच्या शिक्षणासाठी वडील किती मोठा त्याग करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण वाघोड येथील भारत महाजन यांनी घालून दिले आहे. कन्या मिताली महाजन हिला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी उपजीविकेचे मुख्य साधन असलेली एक एकर शेती विकली तसेच शैक्षणिक कर्जही घेतले. आर्थिक अडचणी आणि विविध संकटांचा सामना करत त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही. मुलीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मितालीने सातत्याने मेहनत घेतली. दरम्यान,वडिलांवर बायपास शस्त्रक्रिया झाली, तरीही कुटुंबाने खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला. अखेर मितालीने यशस्वीरित्या एमबीबीएस पदवी संपादन करत वडिलांच्या त्यागाचे आणि विश्वासाचे चीज केले. वडिलांच्या जगाला यशाची गवस मी घातली तिच्या यशामुळे महाजन कुटुंबासह वाघोड गावाचा गौरव वाढला असून मुलींच्या शिक्षणाबाबत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीसाठी असे निर्णय घेतला तर मुली समाजात आपल्या वडिलांची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी नागरिकांमधून बोलले जात आहे