रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण तर प्रचारालाही उदंड प्रतिसाद

रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण तर प्रचारालाही उदंड प्रतिसाद

May 8, 2024 - 21:10
 0
रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण तर प्रचारालाही उदंड प्रतिसाद
रावेर तालुक्यात प्रचार फेरीत श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत व औक्षण तर प्रचारालाही उदंड प्रतिसाद

मुक्ताई वार्ता न्यूज

प्रतिनिधी / रावेर

रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या रावेर तालुक्यातील प्रचाराला अजंदा येथील मंदिरातील दर्शनाने उत्साहात सुरुवात करण्यात आली .या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, यशवंत धनके, राजीव सवर्णे,अब्दुल मुतालिब, राकेश घोरपडे, दिलरुबाब तडवी, लक्ष्मण मोपारी, दीपक पाटील, कल्लू पहलवान, पांडुरंग पाटील (खिरोदा) उपस्थित होते.

* अजंदा येथे सुवासिनींकडून औक्षण

अजंदा येथे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मंदिरात दर्शन घेत प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रचार फेरीत ठिकठिकाणी सुवसिनिंकडून औक्षण करण्यात आले . यावेळी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पांडुरंग पाटील, निलेश पाटील, बाळू पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, समाधान पाटील, अतुल पाटील, कन्हैया बिरपन, रवींद्र बिरपन, प्रवीण बिरपन, दिगंबर सोनवणे, दीपक सोनवणे, खलील खान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी बौद्ध विहाराचे दर्शनही घेतले.

* निंबोल येथे ग्रामस्थांशी चर्चा 

 निंबोल येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, प्रगतिशील शेतकरी संजय पाटील, गोविंद पाटील उर्फ लाला पाटील, हिरालाल पाटील, गोपाल पाटील, अशोक पाटील, एकनाथ कोळी, संदीप धनगर, किरण शेलोडे, निसार शेख, योगेश बिऱ्हाडे, नामदेव सोनवणे, नितीन तायडे, सुनील तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम पाटील यांनी आस्थेवाईकपणे सर्वच मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला आणि मतदान करण्याचे आवाहन केले.

 ऐनपुर येथे युवकांकडून स्वागत

ऐनपुर येथील शनी मंदिराचे श्रीराम पाटील यांनी दर्शन घेऊन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी येथील युवकांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीराम पाटील यांना शुभेच्छा देत स्वागत केले आणि त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी गावातून निघालेल्या प्रचार फेरीत सरपंच अमोल महाजन, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, अरविंद महाजन, सलमान खान, अनिल आसेकर,मोहन पाटील, माया बारी, सरफराज खान, गणेश बाविस्कर, काशीनाथ सोनार, शांताराम महाजन, रवींद्र बारी, शेख जब्बार शेख मोसम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

खिर्डीत साधला संवाद

रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक आणि खिर्डी खुर्द येथे श्रीराम पाटील यांनी मंदिरांचे दर्शन घेत वयोवृद्ध मतदारांनाही अभिवादन केले. यावेळी येथील दर्ग्यावर चादर चढवली. याप्रसंगी खिर्डी बुद्रुक येथे गणेश देवगिरीकर, जगदीश कोचुरे, असलम मिस्तरी, मिलिंद कोचुरे, शेख सलमान शेख जाबीर, नीता कोचुरे, एडवोकेट मोहन कोचुरे, ईश्वर ससाणे तर खिर्डी खुर्दमध्ये अल्ताफ बेग तुकडू बेग, जाकिर पिंजारी, अकिल शेख, आकाश कोचुरे, युवराज कोचुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील