सकल मराठा समाजाचे वडगांव फाटा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सराटी ता. अंबड येथे शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी बेशुट व अमानुष लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाने रावेर तालुक्यातील वडगांव फाटा रस्ता ( बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर ) महामार्गावर मराठा समाज बांधवाने रास्ता रोको करीत आंदोलन केले.

Sep 14, 2023 - 23:35
 0

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क निंभोरा

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सराटी ता. अंबड येथे शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी बेशुट व अमानुष लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाने रावेर तालुक्यातील वडगांव फाटा रस्ता ( बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर ) महामार्गावर मराठा समाज बांधवाने रास्ता रोको करीत आंदोलन केले.

या वेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदविण्यात आला.

वडगांव फाटा रस्त्यावर बुधवार सकाळी 10.वाजता आंदोलनास सुरुवात झाली.

सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुषपणे लाठी चाराच्या निषेधार्थ वडगांव येथील सरपंच धनराज देविदास पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा सादर करून आंदोलनास पाठिंबा दिला.

मराठा समाजाला सर सकट कुणबी प्रमाणपञ देण्यात यावे.तसेच मराठा समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्या सर्व पोलीसांना निलंबित करण्यात यावे.

असे निवेदन शासन दरबारी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांना देण्यात आले.

यावेळी माजी सरपंच डिगंबर चौधरी, नितीन पाटील, प्रमोद कोंडे, पवन चौधरी, धनराज पाटील सरपंच वडगांव,वाय. डी.पाटील, स्वप्निल गिरडे, सुरेंद्र सोनवणे, डॉ. मनोहर पाटील, राजीव बोरसे,हेमंत पवार, चैतन्य कोंडे, योगेश चौधरी, अमोल पाटील, बाळू विचवे, पंढरी महाले, हेमंत पाटील, पियुष पाटील, रविंद्र विचवे, संजय सोनवणे, गुणवंत उंबरकर,राहुल गुरव, विष्णु कोळे, तसेच निंभोरा रिक्षा स्टॉप युनियन यांच्या सह सकल मराठा समाजातील नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत होते. निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महामार्गावर दोन्ही साईडला ट्राफिक जाम झाली होती. आंदोलन शांततेत पार पडले.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील