रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक, कारवाईने तालुक्यात खळबळ
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक, कारवाईने तालुक्यात खळबळ
मुक्ताई न्युज नेटवर्क ।
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन चे पोलिस उप निरीक्षक यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने रावेर तालुक्यासह निंभोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक कैलास ठाकूर यांना १२ जून बुधवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांना लासलुजपत विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत घेऊन जळगाव कडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
हे कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.