रावेर तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणून प्राथमिक उपचार करून बुऱ्हानपूर येथे पाठविण्यात आले
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणून प्राथमिक उपचार करून बुऱ्हानपूर येथे पाठविण्यात आले
रावेर तालुक्यातील दोधे गावात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी वीज कोसळल्याने गावात राहणारे मीराबाई प्रताप जमरे (वय 30), पूजा प्रताप जमरे (वय 13), रेखाबाई खरते (वय 30), कालू खरते (वय 30) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय 32) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून, उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते.
रावेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामजिक कार्यकर्ते दिपक पाटील, संदिप सावळे यांनी वीज पडून जखमी झालेल्यांना रुणालयात दाखल तात्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न केले