रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारात नाल्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह, परिसरात उडाली खळबळ

रावेर, मुक्ताई न्युज नेटवर्क । रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारात ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह एका शेताशेजारील नाल्यात बुधवार रोजी सकाळी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 21, 2024 - 21:42
 0

रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जोद येथील सोनलाल प्रजापती यांच्या कर्जोद शिवारातील शेत गट नं. २९० मधील शेताजवळील नाल्यात, अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील, ५ फूट उंचीचा, सावळ्या रंगाचा, उजव्या पायात काळ्या रंगाची चप्पल, कमरेला काळा करदोडा, मेहंदी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवार सकाळी पाण्यात तरंगतांना व कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे . मृत व्यक्ती पाण्यात बुडून मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले तर याबाबत तपास सुरू आहे 

या संदर्भात संतोष प्रजापती यांच्या तक्रारीवरून रावेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ . विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील