रावेर,यावल,फैजपूर मध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा, श्रीराम फाउंडेशनचे आयोजन

रावेर,यावल,फैजपूर मध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा, श्रीराम फाउंडेशनचे आयोजन

Feb 22, 2024 - 17:09
 0
रावेर,यावल,फैजपूर मध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा, श्रीराम फाउंडेशनचे आयोजन

मुक्ताई वार्ता न्यूज

 नेटवर्क रावेर 

रावेर येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांच्या श्रीराम फाउंडेशन या माध्यमातून महिला जागतिक दिनानिमित्त रावेर, यावल,फैजपूर येथे महाराष्ट्रातील लोकप्रिय व गाजत असलेला महिला भगिनींचा आवडता कार्यक्रम हळदीकुंकू समारंभ व न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा खेळा व जिंका बक्षिसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर क्रांती नाना माळेगावकर अभिनेता कुमारी सह्याद्री माळेगावकर बाल गायिका टीव्ही स्टार यांचा गायनाचा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे

22 फेब्रुवारी रोजी रावेर येथे छोरीया मार्केट जवळ, हेमंत नाईक यांच्या प्लॉटमध्ये संध्याकाळी 6 वाजता तर 23 फेब्रुवारी रोजी खंडोबा वाडी देवस्थान फैजपूर येथे संध्याकाळी सहा वाजता व 24 फेब्रुवारी यावल धनश्री चित्रमंदिर मागील बाजूस संध्याकाळी 6 वाजता अशा तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हळदीकुंकू या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील