रावेरच्या 40 वर्षीय युवकाचा पुण्यात अपघातात दुर्दैवी मृत्यू
रावेरच्या 40 वर्षीय युवकाचा पुण्यात अपघातात दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई वार्ता न्यूज
नेटवर्क रावेर
रावेर येथील शिवाजी चौकात राहणाऱ्या युवकाचा पुण्यात मोटरसायकल अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी रात्री उशिरा घडली. येथील रवींद्र सुधाकर गायकवाड (वय ४० वर्ष ) हा युवक पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी करत होता. नोकरीवरून परत येताना रात्री त्यांच्या मोटर सायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी अकस्मात मृत्यू नोंद पुणे जिल्ह्यातील भोसरी पोलिसात केलेली आहे.
त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि १ मुलगी, १ मुलगा असा परिवार आहे.
या अपघाती मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.