महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे आमदार राजेश एकडे यांचे हस्ते उदघाटन, श्रीराम पाटील यांना २५ हजारांचे लीड देणार आमदार राजेश एकडे यांचे आश्वासन
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे आमदार राजेश एकडे यांचे हस्ते उदघाटन, श्रीराम पाटील यांना २५ हजारांचे लीड देणार आमदार राजेश एकडे यांचे आश्वासन
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / मलकापूर
रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकडे यांनी श्रीराम पाटील यांना २५ हजाराची लीड देण्याचे आश्वासन दिले.
भारतीय जनता पार्टीला मागील निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ६२ हजाराची लीड दिले होते. परंतु कोणतेही विकास काम या मतदारसंघात त्यांच्याकडून झाले नाही. येणाऱ्या काळात केंद्राकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीराम पाटील सारख्या उद्योजक, उमद्या, तरुण, होतकरू उमेदवाराला आपल्याला विजयी करावे लागणार आहे असे आवाहन आमदार एकडे यांनी केले.
काँग्रेसचे नेते श्री कोलते म्हणाले, हा देश एकजूट राहावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सत्ताधारी आपल्याच नशेत आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या धर्मांधांना आपण वेळीच अटकाव करत त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी श्रीराम पाटलांना निवडून आणावे. उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर शहरात महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके , ऍड. साहेबराव मोरे, डॉ. अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजीर अशी जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान सेलकर , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एस पी संभाले , राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी , काँग्रेसचे शिरीष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख , नारू शेठ नेहलाणी , श्यामभाऊ राठी, राजू वाडेकर, प्राध्यापक खर्चे , आताउररहमान जमादार सनाउल्ला जमादार यासह मलकापूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, माजी नगराध्यक्ष हाजी रशीद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.