प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांचा लवकरच रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांचा लवकरच रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
रावेर दि. १० (प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लवकरच रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत.
मुं
बई येथील देवगिरी या अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी दि. ०९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजेला भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन श्रीराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुनीलजी तटकरे साहेब, मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.अनिलजी पाटील यांचीही यावेळी भेट घेतली. याप्रसंगी श्रीराम पाटील यांच्यासोबत जळगाव राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, डी. डी. बच्छाव सर, रावेर माजी नगराध्यक्ष शितल पाटील, प्रा.गोपाल दर्जी सर, मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, भाऊसाहेब सुरेश पाटील, प्रवीणजी बोरसे, इरफान तडवी आदी उपस्थित होते.