दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- यावल शेती शिवारात काही दिवसांनी दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव घेणारा बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :
यावल येथील शिवारात गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला करून बालिकेचा जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले असून, तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निः श्वास सोडला आहे. या बिबट्याला नागपूर येथील जंगलात सोडण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी (धनगर) समाजाचे मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्यास होते. दि. १७ एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारात २ वर्षीय चिमुकली आपल्या आईजवळ गाढ झोपलेली असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून 'रत्ना' या निष्पाप बालिकेचा जीव घेतला होता. दरम्यान, या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारात यश आले आहेत.
हेच काम वन विभागाने अगोदर केले असते तर या निष्पाप दोन मुलांचा जीव गेला नस्ता पण उशिरा का होईना वन विभागाला हे शहाणपण सुचलं यामुळे आता पुढील होणाऱ्या दुर्घटना मात्र थांबणार असल्याचे सध्यातरी बोलले जात आहे
जळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून मोकाट असलेल्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली. वनविभाग जळगावचे जमीरशेख, सुनील भिलावे, विपुल पाटील, समाधान पाटील, स्वप्निल पाठोडे यांच्यासह पथक यांनी तातडीने तीन पिंजरे लावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता नरभक्षक बिबट्याची ड्रोन द्वारे संपूर्ण हालचाली वर लक्ष ठेऊन त्याला रात्री ८ वाजेच्या सुमारात बेशुद्ध पाडून कुठलाही वेळ न घेता पिंजऱ्यात बंद केले.
हा बिबट्या पाच ते सहा वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. जेरबंद झालेला बिबट्या हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला यावल येथे पिंजऱ्यातून नेण्यात आले असून, त्याला नागपूर येथे पोहचविले जाणार आहे. आणखी बिबट्या असल्याच्याही संशय यावेळी वन विभागाने व्यक्त केला आहे