खिरवड ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर - ग्रामपंचायत कार्यालय खिरवड येथे सरपंच पुनम गोपाळ कोळी आणि भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष आशा राजेंद्र सपकाळे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला

Mar 9, 2025 - 16:25
 0
खिरवड ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

 ग्रामपंचायत कार्यालय खिरवड येथे सरपंच पुनम गोपाळ कोळी आणि

भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष आशा राजेंद्र सपकाळे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला सुरुवातीला राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधत महिलाच्या कार्याची माहिती दिली.

 यावेळी ग्रा. प. सदस्य सदस्या ललिता प्रकाश चौधरी, मंगला चंद्रभान संन्याशी अंगणवाडी सेविका कविता कोंघे, संगीता चौधरी, कोकिळा गाढे, आशा वर्कर रंजना कोळी, मंदा भालेराव, निर्मला कोळी तसेच पंचायत अधिकारी एच. डी शिरसाठ समाज सेवक चंद्रभान संन्याशी, गोपाळ कोळी , प्रकाश चौधरी,CRP सुलभा विकास चौधरी , जिप मराठी शाळा मुख्याध्यापक दीपक पाटील सर तसेच उपशिक्षक आणि मुले आणि ग्रामपंचायत लिपीक संतोष गाढे,रोजगार सेवक विशाल कोंघे , ग्रामपंचायत शिपाई काशिनाथ कोळी आणि संगणक ऑपरेटर हिरामण गाढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील