ऐनपुर निंबोल भागाची जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी

ऐनपुर निंबोल भागाची जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी

Sep 17, 2023 - 01:04
Sep 17, 2023 - 01:15
 0

रावेर तालुक्यात तीन दिवस सुरू असलेल्या संततदार पावसामुळे तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली असल्यामुळे बॅक वॉटर रस्त्यावर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून या गावातील काही भागात पाणी घुसल्याने याची पाहणी करण्यासाठी जळगाव  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व आपापली गुरेढोरे व स्वतः पाण्यापासून बचाव करण्यासाठी बाधित क्षेत्रातील घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरता राहण्यासाठी नियोजन करावे असे सांगितले तर प्रशासनाला सूचना देत त्यांना मदत करण्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हतनूर धरणाला भेट दिली

सोमवार पर्यंत पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता नसल्याचे यावेळी कलेक्टर आयुष प्रसाद यांनी सांगितले त्यामुळे रावेर तहसीलदार बंडू कापसे व यांना सूचना देऊन यावर लक्ष ठेवण्याचे सांगितले

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील