*अकोला शहरात आर्टिफिशियल लसूण दाखल, ग्राहकांची होतेय फसवणूक

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला लसुन सध्या भाव खात असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर झाले आहे.

Aug 18, 2024 - 22:20
 0

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

 स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला लसुन सध्या भाव खात असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर झाले आहे.

 यातच काही लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवीत नागरिकांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे, अकोला शहरातील 

 फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी शहरासह कॉलनी भागात  येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसुन विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याची प्रकार उघडकीस आला आहे. सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून एक पाव लसूण विकत घेतले, आज भाजी करण्यासाठी  लसूण घेतला असता यामधील एक लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजनल लसनासारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवली असल्याचे दिसून आले.

 लसण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंट पासून  लसणासारखी बनवली असून यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे, अकोला शहरांमध्ये सध्या लसणाचे भाव हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले असून काही लसणाची काळाबाजारी करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत सक्रिय झाल्या असून या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती मिळत आहे. अकोला शहरातील किरकोळ भाजीविक्रेते यांच्याकडून लसुन घेताना नागरिकांनी काळजीपूर्वक विकत घ्यावी असे आवाहन सुधाकर पाटील यांनी केले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील