चोरट्यांचा पाठलाग करताना शरद राजपूत जखमी, चोरट्यांना लावले पळवून

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- चोरीच्या उद्देशाने अष्टविनायक नगर मध्ये घुसलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना शरद राजपूत हे जखमी झाले परंतु त्यांनी चोरट्यांना पळवून लावले त्यामुळे मोठा अनर्थ टळला

May 9, 2026 - 13:41
 0
चोरट्यांचा पाठलाग करताना शरद राजपूत जखमी, चोरट्यांना लावले पळवून

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

अष्टविनायक नगर मध्ये चोरांनी धुमाकूळ घालत चोरीचा प्रयत्न केला हातात लोखंडी रॉड कोयते घेऊन टू व्हीलर वर सहा ते आठ चोरांनी अष्टविनायक नगर मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने रात्री सुमारे  2.40 च्या दरम्यान बंद घर तपासायला सुरुवात केली त्यानंतर कॉलनीमधील सतर्क महिला यांनी चोरांना पाहिले व आजूबाजू वाल्यांना फोन लावायला सुरुवात केली की बाहेर चोर कमीत कमी आठ ते दहा लोक आहेत आणि पूर्ण हत्यार घेऊन आहेत 

शरद राजपूत यांनी टॉर्च लोखंडी पाईप व शेजारी असलेले दोन तीन जणांना सोबत घेऊन शोधायला सुरुवात केली शोधत असताना तो त्यांना दिसल्यावर चोरांनी पळायला सुरुवात केली त्यांचा पाठलाग करत असताना त्यांनी दोन मोटरसायकल व चार जण बाकीचे दुसऱ्या मार्गाने निघाले चार जणांच्या मागे लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या मागे पाठलाग करत असताना माझे पाय दगडात अडकल्याने खाली पडल्यामुळे हातापायाला जखमा झाल्या तरीपण तिथून उठून त्यांच्या मागे पाठलाग केला त्यांच्यापासून अवघ्या 35 ते 40 फूट अंतरावर होतो त्यांच्या मागे पळालो त्यांनी अष्टविनायक नगर पासून चेतन्य हॉस्पिटल पर्यंत त्यांना पळवून लागले त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला

अष्टविनायक नगर मध्ये घराच्या कुलूप लावलेल्या बऱ्याच घरांची चोरी वाचली  अशाच पद्धतीने सतर्क राहा येणारा काळ खराब आहे म्हणून शेजाऱ्यांचे मोबाईल नंबर जवळ असू द्या व काठी सोबत टॉर्च असणे गरजेचे आहे म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी एकमेकाचे मोबाईल नंबर वेळेवर कॉल करावा व सहकार्य करून अशाच पद्धतीने व पोलिसांची मदत घेऊन आपणही आपल्या कर्तव्य पार पाडले पाहिजे

112 ला कॉल केला तेव्हा रात्री त्वरित api मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती चा आढावा घेतला

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील