BREKING NEWS RAVER: 36 हजारांची लाच घेताना खिरोद्यातील मुख्याध्यापिकेसह क्लर्क धुळे एसीबीच्या जाळ्यात

BREKING NEWS मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर : 36 हजारांची लाच घेताना खिरोद्यातील मुख्याध्यापिकेसह क्लर्क धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने रावेर तालुक्यात शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे

Jul 7, 2025 - 21:04
 0
BREKING NEWS RAVER: 36 हजारांची लाच घेताना खिरोद्यातील मुख्याध्यापिकेसह क्लर्क  धुळे एसीबीच्या जाळ्यात

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l

रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह क्लार्क 36 हजाराची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रांगेहाथ पकडले. ही कारवाई आज धुळे येथील एसीबीच्या पाथकाने केली असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी 36 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील  यांना धुळे एसीबीने अटक केली आहे.

 एका महिला शिक्षिकेचे अशा प्रकारे मुख्याध्यापक महिला कडून  हक्काच्या रजेच्या सुट्टीचे पैशाची मागणी करण्याची हिम्मत कशी काय होते याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असून अशा लाचखोर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे 

सोमवार 7 जुलै रोजी सायंकाळी झालेल्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.या प्रकरणातील तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत. प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी 2 जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला व तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना पाच हजार प्रमाणे सहा महिन्यांचे 30 हजार रुपये मागण्यात आले. 7 रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी लाचेची रक्कम एकूण सहा महिन्यांसाठी 36 हजार रुपये मागण्यात आली व कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली. ही सापळा धुळे एसबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आली.

दोघा आरोपींविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे 

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील