संत लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या कृपेने मंत्रिपदावर राहिलो, मंत्री संजय राठोड

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर I संत लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या कृपेने मंत्रिपदावर राहिलो,जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पाल वृन्दावन धाम आश्रमात भाव व्यक्त केले

Mar 14, 2025 - 09:04
 0
संत लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या कृपेने मंत्रिपदावर राहिलो,  मंत्री संजय राठोड

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

 रावेर :- परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे २००७ आणि २००८ साली यवतमाळ व तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे गीता रामायण सत्संग अमृत सोहळ्यात दर्शन घेतले त्या नंतर त्यांच्या अमृत वाणीचे लाभ घेऊन वेळोवेळी त्यांचे सहवास लाभत राहिले पूज्य बापूजी ची तेजोमय दर्शनात भगवान श्री रामदेवजी बाबा ची छवी वाटली. अश्या अवतारी महापुरुष्याच्या कृपेने तेव्हापासून आतापर्यंत मी चौथ्यादा मंत्रिपदाची धुरा सांभाळून समाज कार्य करीत आहे असा भाव पाल वृंदावन धाम आश्रमात दि १३ मार्च रोजी होळी मिलन महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालक मंत्री संजयभाऊ राठोड यांनी आपल्या मनोगतात भाव प्रगट केले.

   परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी श्री वृंदावन धाम आश्रमात सालाबादाप्रमाणे यंदा ही एकदिवसीय होली मिलन महोत्सव साजरा करण्यात आले या वेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री संजय भाऊ राठोड यांनी परिवारासह विशेष उपस्थिती दिली.त्याच बरोबर व्यास पिठावर आश्रमाचे विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सह फैजपूर चे सतपंथ महामंडलेश्वर स्वामी जनार्धन हरी जी महाराज, झिरण्या येथील स्वामी राघवांनंद जी महाराज,रावेर विधान सभा आमदार अमोल जावळे सह ब्रम्हचारी उपस्थित होते. या होली मिलन महोत्सवात कोरड्या रंगाची व ओल्या रंगाचे रंगारंग महोत्सव साजरा करण्यात आले.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील