रावेर पुणे श्री साई राम ट्रॅव्हलच्या गाडीतून अचानक निघालेल्या धुराने प्रवाशांची उडाली तारांबळ
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-रावेर पुणे श्री साई राम ट्रॅव्हलच्या गाडीतून अचानक निघालेल्या धुराने प्रवाशांची तारांबळ उडाली
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-
रावेर ते पुणे संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्स यांच्या गाडी क्रमांक MH 19 Y 9549 या गाडीचे ब्रेक लाइनर चिपकल्यामुळे अचानक गाडीतून धूर निघाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मधील पांढरी फुल घाटामध्ये 23 एप्रिल सकाळी 2.30 मिनिटांनी घडली
पुण्याकडे जाणाऱ्या कार चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी ड्रायव्हरला सांगितल्यानंतर ड्रायव्हर व कंडक्टर यांनी प्रसंगावधान साधत प्रवाशांना तात्काळ खाली उतरवून तपासणी केली असता गाडीच्या लायनर मध्ये अचानक दूर निघाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला परंतु या घटनेने असे लक्षात आले की आपण स्वतः जेव्हा गाडीमध्ये असतो तेव्हा काय अवस्था असते हे या घटनेवरून लक्षात आले प्रवाशांना उतरवण्याची कंडक्टरची धावपळ तर प्रवाशांनी स्वतःच्या वस्तू सांभाळत उतरण्याची धावपळ हा एक थरारक अनुभव या घटनेवरून माझ्यासह सर्वच प्रवाशांना आला असेल तरी या निमित्ताने ट्रॅव्हल मालक यांना प्रवाशांच्या कडून एक विनंती आहे की आपण आपल्या ड्रायव्हर कंडक्टरंना गाड्यांची निघण्यापूर्वी तपासणी करणे हे खूप गरजेचे आहे भविष्यात या घटना घडवून मोठा अनर्थ होण्यापासून वाचवण्यासाठी आपण आपल्या कर्मचाऱ्यांना या सूचना देण्या खूप गरजेचे आहे यामुळे पुढील होणारी मोठी दुर्घटना ही टळू शकते
# नाव मोठे लक्षण खोटे #
श्री साई राम ट्रॅव्हल्स यांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या रस्त्यावर धावत असतात परंतु यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आपत्कालीन सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना तात्काळत बसावे लागत आहे तसेच गाडी बिघडल्यानंतर गाडी दुरुस्तीसाठी साधनांचा अभाव दिसून आला या गाडीतील ड्रायव्हरने बऱ्याच साईराम च्या गाड्यांना थांबवून मदतीची मागणी केली परंतु कोणाकडेच पूर्ण साहित्य उपलब्ध नसल्यामुळे मदत करता आली नाही यामुळेच असे म्हणावे लागेल की नाव मोठे आहे परंतु लक्षण खोटे दिसून आले
सकाळी ड्युटीवर जाणाऱ्या प्रवाशांचा संताप, 3 तास खोळंबा
गाडीला दुरुस्त करण्यासाठी सुमारे 3 तास वेळ लागल्याने गाडी सकाळी उशिरा पुण्याला पोहोचणार यामुळे नोकरीवर असलेल्या या गाडीमधील प्रवाशांनी संताप व्यक्त करत आमच्या आजची कामाची वेळ निघून गेल्याने आमचे आर्थिक नुकसान होईल याची भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला.
प्रवाशांना पिण्यासाठी गरम पाणी
श्री साईराम ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून वेगवेगळ्या सीट साठी वेगवेगळे दर आकारात असते सुमारे 900 ते 1200 प्रत्येक कडून भाडे आकारले पण पिण्यासाठी मात्र गरम पाणी दिले यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला
पुरुषांसाठी स्वच्छतागृह उघड्यावर
खाण्यापिण्यासाठी व प्रसाधन साठी हॉटेलवर थांबवले होते त्या हॉटेलवर महिलांसाठी स्वच्छतागृह होते परंतु पुरुषांना उघड्यावरच जावे लागले तर खाण्या पिण्याच्या वस्तू वाढीव दराने विक्री होत असल्याची खंत प्रवाशांमधून व्यक्त होत होती
प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलून वेळोवेळी सूचना व प्रवाशांच्या हिताचे नियम व अटी ट्रॅव्हल्स मालकांना लावण्यात याव्या अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे