रावेरला २ फेब्रुवारीला कृषीसेवक सन्मान सोहळा : राज्यातील 40 जणांचा होणार गौरव
रावेरला २ फेब्रुवारीला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी यांचा सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले आहे यात महाराष्ट्रातील 40 जणांचा कृषी सेवक च्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
साप्ताहिक कृषीसेवकतर्फे वर्धापनदिनाचे औचित्य साधून गेल्या सहा वर्षापासून राज्यातील शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. २ फेब्रुवारीला हा सन्मान सोहळा रावेर ता. रावेर जि जळगाव येथील कै श्रीमती शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात संपन्न होत आहे. या सन्मान सोहळ्यात राज्यातील निवड झालेल्या ४० पुरस्कारार्थींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील असतील. तर कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे करणार आहेत. नांगर पूजन व दीप प्रज्वलन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व माजी आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते संपन्न होईल. पुरस्कार वितरण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे व नाशिक येथील अग्रीसर्च उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार व गोदावरी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील व आंतर राष्ट्रीय जेष्ठ केळी तज्ञ तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ के बी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, माजी कृषी सहसंचलक अनिल भोकरे, गोदावरी फौंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी राज्यध्यक्ष जे के पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश धनके, उद्योजक डॉ प्रशांत सरोदे, उद्योजक श्रीराम पाटील, उद्योजक अमित भारंबे, उद्योजक युगंधर पवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडीत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, माऊली फौंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत महाजन, भारती ज्वेलर्सच्या संचालिका भारती गनवाणी, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, जळगाव अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी एस पाटील, राज इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राजेंद्र चौधरी, कामगार नेते दिलीप कांबळे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी एल ए पाटील, रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार सन्मान सोहळ्याचे यंदाचे हे सातवे वर्ष असून शाल,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आदर्श शेतकरी, युवा शेतकरी, महिला शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, कृषी उद्योजक, कृषिमित्र, कृषी बचत गट, कृषी विज्ञान केंद्र, फार्मर प्रोड्युसर कंपनी, कृषी लेखक (साहित्यिक) या विविध गटातून एकूण 40 पुरस्कारार्थींची निवड करण्यात आलेली आहे
* यांचा होणार सन्मान :
*कृषीरत्न कृषीसेवक पुरस्कार : प्रकाश दादाभाऊ नेहरकर (रा एडगाव ता जुन्नर जि पुणे), मोहनसिंग गणेशसिंग राजपूत (रा बेटावद खुर्द ता जामनेर जि जळगाव),परमानंद हुंदराज मोटवानी (अकोला).
*आदर्श शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : नितीन हरीश गणवाणी (रा रावेर ता रावेर जि जळगाव), ज्ञानेश्वर भाऊ आवळे (रा कुरकुंडी ता खेड जि पुणे), घनशाम कडू महाजन (रा सावखेडा ता रावेर जि जळगाव), चंद्रकांत रामचंद्र पाटील (रा डहाणू आगर ता डहाणू जि पालघर), गिरीश रमेश परतणे (रा अहिरवाडी ता रावेर जि जळगाव), भगवंता शंकर नांगरे (रा उंडेखडक ता जुन्नर जि पुणे), पराग विजयराव सराफ (रा यावल), मदन श्रावण महाजन (रा. वाघोदा बुद्रुक ता रावेर जि जळगाव), बाळकृष्ण वासुदेव पाटील (रा कंडारी ता नांदुरा जि बुलडाणा), हेमंत वाल्मिक पवार (रा निंभोरा ता रावेर जि जळगाव).
*आदर्श महिला शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : सौ कांचन अजित मोरे (रा शिरोली खुर्द ता जुन्नर जि पुणे)
*आदर्श युवा शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : किरण अशोक सूर्यवंशी (रा बांबरूड राणीचे ता पाचोरा जि जळगाव), नितीन प्रकाश पाटील (रा नेहेता ता रावेर जि जळगाव), राजेंद्र अनापसिंग वसावे (रा काठी ता अक्कलकुवा जि नंदुरबार), हरीश किसन धांडे (रा रोझोदा ता रावेर जि जळगाव), विवेक शंकर माने (रा औन्ढी ता मोहोळ जि सोलापूर), सचिन(मोहन) पंढरीनाथ पाटील (रा हतनूर ता भुसावळ जि जळगाव), प्रमोद भास्कर मोपारी (रा नेहेता ता रावेर जि जळगाव)
*कृषी शास्त्रज्ञ कृषीसेवक पुरस्कार : डॉ कोमल अशोक चव्हाण (पुणे ), डॉ गिरीश हिरामण जगदेव (पुणे), विजय भागवत पाटील (रा पांगरा ता नागद जि छत्रपती संभाजीनगर)
*कृषीमित्र कृषीसेवक पुरस्कार : देवेंद्र वामनराव बाणाईत (रा नागपूर), सुनील मधुकर पोकरे (रा पुणे), रुपेश रामदास दिघे (रा काठापूर खुर्द ता शिरूर जि पुणे), विश्वनाथ प्रभाकर मुखरे (रा बोरी खुर्द ता पुसद जि यवतमाळ), निखील रमेश यादव (रा आर्वी ता सेलू जि वर्धा), गोकुळ नारायण माळी (रा चिनावल ता रावेर जि जळगाव)
*आदर्श कृषीसेवक कृषी संस्था : प्रकाश रमेश देवरवाडे ऑर्गानिक ग्रामीण किसान शेतकरी गट (देवळा ता अंबाजोगाई जि बीड )
आदर्श कृषी उद्योजक कृषीसेवक पुरस्कार : रामभाऊ शंकर पाटील (एमटेल अग्रोटेक प्रा लि जळगाव), सौ. काव्या राजेश दातखिळे (कृषीकन्या अग्रो इंडस्ट्रीज, दातखिळेवाडी ता जुन्नर जि पुणे), सतीश पाटील ओम इंजिनीरिंग (निंबोल ता रावेर जि जळगाव), सौ अश्विनी विजय पाटील (नांदू पिंप्री ता मुक्ताईनगर जि जळगाव )
आदर्श कृषी लेखक कृषीसेवक पुरस्कार : डॉ आदिनाथ ताकटे(राहुरी), डॉ कृष्णा शंकर शहाणे(नाशिक), महेश महाजन(पाल ता रावेर जि जळगाव), डॉ अजय गवळी (नाशिक).