रावेरमध्ये नगरसेविका नगरसेवक यांच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-रावेरमध्ये नगरसेविका नगरसेवक यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत नगदी रुपयांसह सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचे चोरी केल्याची घटना घडल्याने रावेर शहरात खळबळ उडाली आहे

Mar 20, 2026 - 10:04
 0
रावेरमध्ये नगरसेविका नगरसेवक यांच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

रावेर शहरातील भर वस्तीतील रामबाग मैदान मधील नगरसेविका प्रमिला चुडामण पाटील व स्वीकृत नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश करून चोरी करत लाखो नगदी रुपयांसह लाखोच्या दागिन्यांची चोरी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे 

याबाबत त्यांना सकाळी याबाबत दिलीप पाटील यांना सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी भेट देत चौकशी सुरू केली असून श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील