मुंबई येथे उद्या उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपा पक्षप्रवेश
मुंबई येथे उद्या उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपा पक्षप्रवेश
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी भाजपासोबत जाणार असून उद्या मुंबई येथे भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृतपणे प्रवेश करणार असून यासाठी रावेर यावल तालुक्यातून कार्यकर्त्यांसह रात्री रवाना होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे
उद्योजक श्रीराम पाटील यांच्या भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेशाने रावेर यावल मतदारसंघातील चित्र मात्र बदलणार असून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे