महाराष्ट्रातून कृषी पत्रकारितेत रावेर चे पत्रकार कृष्णा पाटील यांचा गुजरातमध्ये राज्यपालांच्या हस्ते कृषी सेवा पुरस्काराने सन्मान
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l राष्ट्रीय स्तरावरील असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ-INDIA) तर्फे साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना 2024 या वर्षाच्या राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्काराने गांधीनगर (गुजरात) येथे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांच्या उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
राष्ट्रीय स्तरावरील असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ-INDIA) तर्फे साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना 2024 या वर्षाच्या राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्काराने गांधीनगर (गुजरात) येथे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांच्या उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कृषी विस्तार व कृषी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातून कृषी पत्रकारिता क्षेत्रातून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
21 सप्टेंबरला गांधीनगर (गुजरात) येथील हेलिपॅड एक्झिबिषण सेंटर मध्ये असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट या संस्थेतर्फे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल, राष्ट्रीय कृषी पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोळकर व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातून कृषी पत्रकारितेतून पुरस्कार जाहीर झालेले कृष्णा पाटील हे एकमेव पत्रकार ठरले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेत व दहा वर्षापासून साप्ताहिक कृषिसेवकच्या माध्यमातून कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी कृषी विस्तारासाठी प्रयत्न व शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शन या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. पेपर वाटणारा मुलगा ते यशस्वी संपादक अशी ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली आहे. साप्ताहिक कृषिसेवकतर्फे शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा केल्या जाणाऱ्या सन्मान सोहळ्याची दखल आयोजकांतर्फे घेण्यात आली होती.