बस व मोटरसायकलच्या अपघातात तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर - बस व मोटरसायकलच्या अपघातात तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना रावेर बराणपुर रोडवर गुरुवार रोजी संध्याकाळी घडली

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर बऱ्हाणपूर रोडवर साखर कारखान्याजवळ बस व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात तरुण युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संध्याकाळी घडली
रावेर कडून आटवाडा कडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक MH14 BT 1704 व विना नंबर मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात अंदाजे 35 ते 40 वयोगटातील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार रोजी संध्याकाळी घडली.
ह्या घटनेचा पुढील तपास रावेर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे तरुणाची ओळख पटवण्यासाठी रावेर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.