पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेची जय्यत तयारी ; महाराष्ट्र व मध्यप्रदेशातुन पायी दिंडी दाखल होणार*

पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेची जय्यत तयारी ; महाराष्ट्र व मध्यप्रदेशातुन पायी दिंडी दाखल होणार

Jul 20, 2024 - 01:57
 0
पाल वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेची जय्यत तयारी ; महाराष्ट्र व मध्यप्रदेशातुन  पायी दिंडी दाखल होणार*

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

पाल ता रावेर :- अखील भारतीय चैतन्य साधक परिवार तथा सातपुडयातील गोर गरीबाचे सद्गुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृन्दावम धाम पाल येथे सालाबादाप्रमाणे यंदा ही दी :- २१ जुलै रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्स्यवानिमित्त जय्यत तयारी ला सुरुवात झालेली आहे.

    परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांच्या स्मृति तसेच गुरु शिष्याचे अटूट बंधन असलेल्या अखील भारतीय चैतन्य साधक परिवार देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संखेने येऊन गुरुपौर्णिमा या रावेर तालुक्यातील श्री वृन्दावन धाम पाल आश्रमात साजरी करतात.

   पूज्य बापूजिच्या ब्रम्हलीना पच्यात या वृन्दावन धाम पाल आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सनिध्यात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार असून दी :- २१ जुलै रोजी पाल आश्रमातून किमान दीडशे ते दोनशे किलोमीटर वर असलेल्या मध्यप्रदेशतील चारुकेश्वर आश्रम व महाराष्ट्रातील औरंगाबाद कन्नड़ ,सोयगाव,जामनेर येथून हजारो भाविक पायी दिंडी घेऊन पाल आश्रमात आज दाखल होणार .तसेच परिसरातून संत महंत महामंडलेश्वरांची उपस्थिति सुद्धा लाभणार असून या दोन दिवसीय गुरुपौर्णिमा महोस्तवानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकाच्या राहण्याची तसेच भोजन, सत्संग पंडाल व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे .त्याच प्रमाणे ,आरोग्य उपचार, पाल ग्राम पंचायत स्वच्छ्ता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्या करिता पोलिस प्रशासन, तसेच रावेर ते पाल व सावदा ते पाल येथून भाविकाना येण्याकरिता कुठलाही त्रास न व्हावा या साठी रावेर आगार महामंडळ तर्फे जादा बस सेवा, आणि महावितरण तर्फे विज पुरवठा अखंडित रहावे अश्या सर्व स्तरावरिल अधिकारी याना निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली असून या कार्यक्रमात प्रशासनातर्फे अशी या गुरुपौर्णिमा महोस्तवाकरिता पाल आश्रमासाठी सेवा पुरविन्यात यावी.असे चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समितितर्फे निवेदनातून कळविन्यात आलेले आहे.

   या गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या समाधि दर्शना साठी देशभरातून दरवर्षाप्रमाने यंदा ही किमान पन्नास हजारा च्या आसपास भाविक भक्त पाल येथे दाखल होणार असून व पायी दिंडी चे स्वागत करीता आश्रमाचे पदस्थ व संत समिति चे प्रदेश अध्यक्ष श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सह ब्रम्हचारी संत श्री दिव्य चैतन्य,श्री शिव चैतन्य,श्री नवनीत चैतन्य,श्री ब्रज चैतन्य,श्री ऋषि चैतन्य,श्री हरीश चैतन्य,श्री शोभाराम चैतन्य महाराज सह आदी किमान दहा किलोमीटर आधी पर्यन्त घेण्यासाठी जातात.तसेच या पायी दिंडीत येणाऱ्या साधकाना चैतन्य साधक परिवार समिति तर्फे ठिकठीकानी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येते.

     दी २० जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्त पाल वृंदावन धाम आश्रमात सायंकाळी सात वाजेपासुन सत्संग,भजन संध्या, तसेच सेवा देणाऱ्या विविध समिति चे स्वागत आणि दहावी व बारावित अव्वल आलेल्या विद्यार्थांचे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील