पत्रकार कृष्णा पाटील यांना राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर,अहमदाबाद येथे राज्यपाल व कृषी मंत्र्याच्या हस्ते होणार सन्मान

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर प्रतिनिधी l साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ) तर्फे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल 2024 या वर्षाचा राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Sep 7, 2024 - 21:12
 0
पत्रकार कृष्णा पाटील यांना राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर,अहमदाबाद येथे राज्यपाल व कृषी मंत्र्याच्या हस्ते होणार सन्मान

 मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर/प्रतिनिधी 

साप्ताहिक कृषिसेवकचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ) तर्फे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल 2024 या वर्षाचा राज्यस्तरीय कृषीसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

21 सप्टेंबरला गांधीनगर (अहमदाबाद ) गुजरात येथील हेलिपॅड एक्झिबिषण सेंटर मध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते व गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातून कृषी पत्रकारितेतून पुरस्कार जाहीर झालेले कृष्णा पाटील हे एकमेव पत्रकार ठरले आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराची घोषणा असोसिएशन ऑफ नॅशनल ऍग्रीकल्चर जर्नालिस्ट (ANAJ) संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोळकर यांनी केली. गेल्या तीस वर्षांपासून पत्रकारितेत व दहा वर्षापासून साप्ताहिक कृषिसेवकच्या माध्यमातून कृषी विस्तार व शेतकऱ्यांना मार्गदर्शन या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पेपर वाटणारा मुलगा ते यशस्वी संपादक अशी ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील