निमड्या वनक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीचा डाव उधळला; बंदुकीसह सहा आरोपी वन विभागाच्या ताब्यात
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर:- रावेर तालुक्यातील निमड्या वनक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीचा डाव फसला असून बंदुकीसह सहा आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे
रावेर- मुक्ताई न्यूज नेटवर्क । रावेर तालुक्यातील निमड्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या टोळीवर वनविभागाने धडक कारवाई करत सहा जणांना बंदुकीसह ताब्यात घेतल्याने संपूर्ण तालुक्यासह खळबळ उडाली आहे.
या धडक कारवाईमुळे वन्यप्राणी तस्करांमध्ये व शिकार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीवप्रेमी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे
निमड्या वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५२ मध्ये शिकारी शस्त्रांसह येणार असून शिकार करण्यासाठी वनपरिक्षेत्रात असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शितल नगराळे यांनी तातडीने आपल्या पथकासह रणनीती आखून निमड्या परिसरात सापळा रचत संशयित हालचाली दिसताच वनविभागाच्या पथकाने छापा टाकत बंदुकीसह सहा आरोपींना अटक केली
या कारवाईत सुनिल भिल्या पावरा, अर्जुन खुमसिंग पावरा, नवलसिंग सखाराम पावरा, लालू लखरा पावरा, श्रीराम खुमसिंग बारेला आणि राजाराम हाड्या पावरा (सर्व रा. निमड्या) या सहा आरोपींना बंदुकसह ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एक बंदूक तसेच वन्यप्राण्यांचे मांस जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे ही संपूर्ण कारवाई वन संरक्षक (वन्यजीव) श्री. रामगावकर, उपवन संरक्षक कृष्णा भवर व सह वन संरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकात रजनी घोडके, संभाजी सूर्यवंशी, जनदिश बारेला, रियाज तडवी, शालिग्राम राठोड, जगदीश चव्हाण, आदिल शेख, बबलू खान व बाळू भोई यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
यापुढेही अशा प्रकारे माहिती मिळाल्यास वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत असतील असे माहिती वन विभागातर्फे देण्यात आली यामुळेच अशा शिकारी करणाऱ्या तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन वन्य प्राण्यांचे जीव वाचवण्यात वन विभागाला मदत मिळत असते यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारे संशय हालचाली दिसल्यास वन विभागाला कळविणे हे नागरिकांनी कर्तव्य समजून वन्यप्रांचे जीव वाचवण्यात मदत करावे असे आव्हान यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे