नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय बालिका ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर - नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय बालिका ठार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Apr 17, 2025 - 16:50
 0
नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय बालिका ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-

 नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात काही दिवसापूर्वीच एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवार 16 मार्च रोजी डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत बालिका मेंढपाळ कुटुंबातील असून, वन विभागाने तातडीने नाशिक येथून रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील गट क्रमांक 741 मधील शेतशिवारात मेंढपाळांची तीन कुटुंबे मागील 5 दिवसांपासून वास्तव्यास आहेत. बुधवार 16 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रत्नाबाई रूपनर (वय 2 वर्षे) ही चिमुकली आपल्या आई जिजाबाई रूपनर हिच्यासोबत झोपलेली असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालत तिला अलगद उचलून नेले तेवढ्यात चिमुरडीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी आईचा जीव कासावीस झाला. आईच्या आरडाओरडीनंतरही अंधाराचा फायदा घेत बिबट्याने केळीच्या बागेत धूम ठोकली. बालिकेचा शोध घेतला असता काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून बिबट्याने तिला फरफटत नेऊन ठार केल्याने बालिकेच्या आई टाहो फोडला. बालिकेच्या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिरवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे 

 या अत्यंत वाईट घटनेची माहिती मिळताच रात्री 1 वाजेच्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील, पश्चिम विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि त्यांचे सहकारीही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने घटनेची तातडीने दखल घेवून परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसा वीज नसल्याने रात्री शेती शिवारात जाणे भाग पडत आहे. त्यात बिबट्याची दहशत वाढल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली असून, तातडीने कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक येथून विशेष रेस्क्यू टीमला पाचारण

 काही दिवसांपूर्वीच  किनगाव परिसरात  देखील बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला होता. आता दुसऱ्यांदा बालकाचा बळी गेल्याने या नरभक्षक बिबट्याला पकडण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत यावल वन विभागाचे डीएफओ जमीर शेख यांनी सांगितले की, दोन्ही घटनांमध्ये सुमारे 9 किमीचे अंतर असून, हा नरभक्षक बिबट्या मादी आहे. तिला पकडण्यासाठी नाशिक येथून विशेष रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली आहे. आवश्यक त्या परवानग्या घेतल्या असून, परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागपूर (चिडीया घर) मध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाडून देण्यात आली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील