दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ व्यक्त
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l मुक्ताईनगर परिसरात अवैध उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात तालुक्यातील सालबर्डी येथील दोन सखे भाऊ तलावात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना रविवार रोजी घडली. दोघी भाऊ अल्पवयीन असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेरl
मुक्ताईनगर परिसरात अवैध उत्खननामुळे तयार झालेल्या तलावात तालुक्यातील सालबर्डी येथील दोन सखे भाऊ तलावात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना रविवार रोजी घडली. दोघी भाऊ अल्पवयीन असून परिसरावर शोककळा पसरली आहे.
सालबर्डी येथे कृष्णा गोपाळ ढाके हे आपली पत्नी व दोन मुलांसह रहात असून दि. १३ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारच्या वेळी त्यांची दोन मुले वेदांत कृष्णा ढाके. वय १५ वर्ष. हा इयत्ता नववीत शिकत होता. व चिराग कृष्णा ढाके. वय १० वर्ष. हा इयत्ता पाचवीत शिकत होता. ही दोन्ही मुले सालबर्डी शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेले असता यातील चिराग हा शिवारातील तलावा जवळ बकऱ्या चारत असतांना त्यांचा पाय घसरून तो तलावात पडला, त्याला पोहता येत नसल्याने तलावातील पाण्यात तो बुचकाळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ वेदांत याने देखील पाण्यात उडी मारली. दुर्दैवाने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही भाऊ तलावात बुडालेले दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला
या घटने बद्दलची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.
*अवैध उत्खननाने घेतले दोघांचे बळी*
सालबर्डी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्यामुळे मोठं मोठे खड्डे पडून मानव निर्मित तलाव झाले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने या मोठं मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. आणि याच तलावाने दोन अजाण बालकांचा बळी घेतला आहे.
सालबर्डी येथील वडील कृष्णा गोपाळ ढाके हे रिक्षा चालवतात तर आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या व त्यामुळे तयार झालेल्या तलावात दोन्ही मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैव घटनेबद्दल मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते