उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा गोंधळ डोंगर कोसळला असून देशभरात शोक व्यक्त होत आहे

Jan 28, 2026 - 10:30
 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात  निधन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याने त्यांच्यासह सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनेही या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देशभरातून शोक व्यक्त होत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील