सी एम व्ही रोगाचा केळीला फटका शेतकरी हतबल,शासनाने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्याने साडे सात एकर शेतातील तेरा हजार केळीची लागवड केलेली खोडे सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे काढून फेकली.
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील भावराव पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जून महिन्यात साडे सात एकर केळीचे तेरा हजार रोपांची लागवड केली होती, परंतु सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे आता या शेतकऱ्याने तेरा हजार केळीची लागवड केलेली खोडे शेतातून काढून टाकले आहेत.
आधीच शेतकरी केलेला भाव नसल्याने अडचणीत सापडला आहे ,त्यातच वादळी वाऱ्याने शेतात आलेली केळीचे झाडे उंबळून पडले आहेत, आणि आता या सीएमव्ही च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्येचे संकट उभा राहिल्याचं शेतकरी भावराव पाटील यांनी बोलून दाखवलेला आहे.