बलवाडी शेती शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह; निंभोरा पोलिस स्टे. अकस्मात मृत्यूची नोंद.

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- रावेर तालुक्यातील बलवाडी येथे शेती शिवारातअनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे; याबाबत निंभोरा पोलिस स्टे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

Jan 27, 2026 - 20:28
 0
बलवाडी शेती शिवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह; निंभोरा पोलिस स्टे. अकस्मात मृत्यूची नोंद.

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

 रावेर तालुक्यातील बलवाडी येथे मंगळवार 27 जानेवारी रोजी बलवाडी ते सिंगनूर शिवारातील विनायक नारायण पाटील यांच्या शेत बांधावरील रस्त्याच्या साईड पट्टी लागत असलेल्या चारीत एक अनोळखी तरुण नाव गाव माहीत नाही. अंदाजे 35 ते 40 वर्षवयोगटातील इसम हा मयत स्थितीत मिळून आला याबाबत विजय जगनाथ पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशन ला माहिती दिल्याने सपोनि मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे, फौजदार ममता तडवी, हे का विजू जावरे, हे का रिजवान पिंजारी, परेश सोनवणे रशीद तडवी, तसेच फॉरेन्सिक स्टाफ फैजपूर विभाग यांनी घटना स्थळी जाऊन अधिक चौकशी केली.

 मयत एक अनोळखी इसम नाव गाव माहीत नाही वय 35 ते 40 वयोगटातील अंगात गुलाबी चेक्स पांढऱ्या रंगाचा फुलबहीचा शर्ट, त्याखाली पांढऱ्या रंगाची बनियान त्यावर लाल किनार असलेली मागील बाजूस ARMY व पुढील बाजूस इंडियन आर्मी असे लिहिलेले व एक राखाडी रंगाची जॅकेट,कमरेवर साधी ग्रे राखाडी रंगाची पॅन्ट, त्याखाली अंडरवेयर चॉकलेटी रंगाची या प्रमाणे सदर वर्णानाचा मयत इसम आढळून आला असून निंभोरा पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत कोणी ओळखत असेल तर निंभोरा पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आव्हान निंभोरा पोलिस स्टेशनच्या सपोनि मीरा देशमुख यांनी केले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील