निंबोल गावात चोरट्यांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत १० ते १५ घरफोड्या,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- निंबोल गावात चोरट्यांचा धुमाकूळ घालत सहा महिन्यांत १० ते १५ घरफोड्या यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील निंबोल येथे चोरट्यांचे सत्र सुरूच असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घालत ग्रामपंचायत कार्यालय फोडून डीव्हीआर व सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याची घटना घडली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही तोडफोड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय गावातील काही घरांमध्येही चोऱ्या झाल्या असून, घरात रहिवासी असतानाही चोरट्यांनी धाडसाने घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. मागील सहा महिन्यांत सुमारे १० ते १५ घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे.सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, अनेकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. तर नेहमी घडणाऱ्या या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची गरज आहे सुदैवाने आजपर्यंत कोणीच रहिवासी त्यांच्या तावडीत न सापडल्यामुळे पुढील मोठा दुर्घटना घडली नाही याचा पोलीस प्रशासनाने गंभीर विचार करून होणाऱ्या पुढील घटनांना आवर घालण्यासाठी चोरांच्या मुस्क्या गरजेचे आहे
ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी करत गावात नियमित गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे व चोरट्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.