तासखेडा तालुका रावेर येथील बाप लेकीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- रावेर तालुक्यातील तासखेडा येथील बाप लेकीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात व तालुक्यात अळहाळ व्यक्त होत आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-
दि. १३ जून शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास तासखेडा गावात एक हृदयद्रावक घटना घडली. घरात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे वडील समाधान अशोक कोळी (वय ३६) आणि त्यांची मुलगी कु. मानवी समाधान कोळी (वय ११) या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी घरात कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारांवरून रुमाल काढण्यासाठी गेले. दरम्यान, त्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांनी रुमाल हातात घेताच जोराचा शॉक बसून ते फेकले गेले.हे पाहून त्यांचा मुलगा समाधान वडिलांना उचलण्यासाठी धावला. मात्र, तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तोही तिथेच चिकटून पडला. बाजूला झोपलेली त्यांची मुलगी मानवी देखील पुढे आली आणि तिलाही विजेचा शॉक बसला.
तिघांनाही तत्काळ सावदा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी समाधान तायडे व मानवी तायडे यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरला करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अश्रूच्या धारेत बाप-लेकीला शेवटचा निरोप दिला.
या दुर्दैवी घटनेने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो