रावेर येथील हद्दपार करण्यात आलेल्या इसमाकडून पोलिसांनी गावठी कट्टा (पिस्तूल ) व दोन काडतुस जप्त

रावेर ता .१५ येथील हद्दपार करण्यात आलेल्या इसमाकडून पोलिसांनी गावठी कट्टा (पिस्तूल ) व दोन काडतुस जप्त केले आहे. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी त्यास अटक केली आहे .रावेर ता .१५ येथील हद्दपार करण्यात आलेल्या इसमाकडून पोलिसांनी गावठी कट्टा (पिस्तूल ) व दोन काडतुस जप्त केले आहे. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी त्यास अटक केली आहे .

Sep 15, 2023 - 22:39
 0
रावेर येथील हद्दपार करण्यात आलेल्या इसमाकडून पोलिसांनी गावठी कट्टा (पिस्तूल ) व दोन काडतुस जप्त

रावेर ता .१५ येथील हद्दपार करण्यात आलेल्या इसमाकडून पोलिसांनी गावठी कट्टा (पिस्तूल ) व दोन काडतुस जप्त केले आहे. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीसांनी त्यास अटक केली आहे .

     या बाबतचे वृत्त असे की येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पोलिस उपनिरिक्षक सचिन नवले पोलिस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण , पोलिस सुरेश मेढे,, सचिन घुगे, अमोल जाधव , सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विशाल पाटील, समाधान ठाकुर यांनी

आकाश लक्ष्मण रील रा रामदेवबाबा नगर रावेर याला अटक केली आहे

 आकाश रील याला २३ मार्च २०२३ रोजी फैजपूर येथील उप विभागीय दंडाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. मात्र सदर आरोपी रावेर शहरात असल्याची व त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यानुसार एक पथक पाठवून खात्री केली असता रामदेव बाबा नगरात आकाश रील मिळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा देशी कट्टा (पिस्तूल) व ५०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस आढळून आले. आकाश रील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर करीत आहेत .

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील