उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपा पक्षप्रवेश मुंबई येथे संपन्न

उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपा पक्षप्रवेश मुंबई येथे संपन्न

Feb 14, 2024 - 19:19
 0
उद्योजक श्रीराम पाटील यांचा  भाजपा पक्षप्रवेश मुंबई येथे संपन्न

मुक्ताई वार्ता

 न्यूज नेटवर्क रावेर

रावेर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत बुधवारी दुपारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालय मुंबई येथे त्यांच्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

श्रीराम पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व व त्यांची कार्यशैली यावर प्रभावित होऊन त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत या पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

*यांनी केला भाजपा मध्ये प्रवेश*

श्रीराम दयाराम पाटील,चेअरमन श्रीराम उद्योग समूह,शितल रमेश पाटील,मा. नगराध्यक्ष नगरपरिषद रावेर,अब्दुल मूत्तलीफ मा. उप. नगराध्यक्ष नगरपरिषद रावेर, सचिन अशोक मोरे उपसरपंच बोरावल ता. यावल,सोपान पाटील संचालक रावेर पीपल बँक,केतन राणे संचालक विकासो विवरे, कुलदीप पाटील संचालक विकासो बोरावल,राजेंद्र चौधरी मा. ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,स्वप्नील पाटील सेक्रेटरी मायर्को व्हिजन अकॅडमी रावेर, प्रशांत पाटील, मा. ता. अध्यक्ष मराठा सेवा संघ, विनोद पाटील मा. संचालक विकासो पातोंडी, निलेश पाटील यावल,रामचंद्र पाटील प्रगतीशील शेतकरी पातोंडी,गोविंद पाटील प्रगतीशील शेतकरी केऱ्हाळे,लक्ष्मण चौधरी अहिरवाडी, सुरज कोलते जळगाव, नावा खाटीक रावेर

*यांची उपस्थिती होती*

गोपाल दर्जी अध्यक्ष दर्जी फौंडेशन जळगाव,प्रल्हाद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, महेश चौधरी भाजपा ता. अध्यक्ष रावेर पद्माकर महाजन, प्रवीण पाचपोहे,सुनील पाटील मा. भाजपा ता. अध्यक्ष रावेर, राहुल पाटील, शेख जाहीर विवरा, बंडू पाटील रावेर, दिपक नगरे,जयवंत पाटील रावेर, प्रशांत चौधरी, नितिन बिरपण यांची उपस्थिती होती

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील